नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड सहकुटुंब बघितला. अतिशय दर्जेदार निर्मिती आहेच.झोपडपट्टीतील बिघडणाऱ्या पिढीला सावरण्याची किमया विजय सर किती कठीण परिस्थितीत साधतात हे बघताना मन हेलावून जाते.झुंड बद्दल सर्वत्र समीक्षा आल्यात.माझ्याही मनात झुंड ने वेगवेगळ्या प्रश्नांना जन्मास घातले आहे.झोपडपट्टीतील ही झुंड जगण्याच्या संघर्षातून जन्मास आली आहे पण आता धर्माच्या,जातीच्या नावाने ज्या झुंडी एकमेकांवर आक्रमक करीत आहेत,त्या झुंडी कशा थोपविणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या झुंडीचे आक्रमक होत आहे.पक्षीय झुंड तर वेगळीच झिंग चढवीत आहे.नेते आरामात बसून या झुंडींचे नेतृत्व करीत आहेत. या झुंडी कोणताही विचार न करता बुलेट थेअरी सारख्या एकमेकांवर तुटून पडत आहेत. सोसिएल मीडियातील झुंड तर आपला मेंदू गहाण ठेऊन आपसात लढत आहेत.एखाद्या नेत्याविरुद्ध कारवाई झाली किंवा साधा नोटीस आला तरी झुंड आक्रमक होऊन सर्वसामान्य माणसाला त्रास देते आहे.
अलीकडच्या पिढीला तर या झुंडीची लागण एव्हाना झाली आहे.हातात स्मार्ट फोन आणि बापाच्या कमाईने घेतलेली दुचाकी वायूवेगाने पडताना जीव मुठीत धरून समोरच्या व्यक्तीला जावे लागते आहे.अशा झुंडी कशा थोपविणार हा प्रश्न आहे.
नागराज मंजुळे यांनी वर्मावर बोट ठेवले आहे.प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून बघावा.
****
प्रा. अरविंद खोब्रागडे
ज्येष्ठ पत्रकार, चंद्रपूर