- लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*डॉ. बुक्कावार यांच्या हॉस्पीटलमध्ये रक्तसाठवणूक केंद्राचे उदघाटन.*
मनुष्याने आज विविध क्षेत्रात प्रगती व क्रांती केली असतानाही तो रक्त मात्र बनवू शकत नाही. जीव वाचविण्यासाठी रक्त देण्याची भावना जागृत व्हावी यासाठी रा.स्व. संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. के. ब. हेडगेवार यांच्या जीवनकार्यातुन प्रेरणा घेवून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक १३ मार्च २०२२ रोजी डॉ. अंबरीश बुक्कावार यांच्या हॉस्पीटलमध्ये डॉ. हेडगेवार रक्तपेढीद्वारे रक्त साठवणूक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, रा.स्व. संघाचे नगर संघचालक अॅड. रवी भागवत, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहीते, डॉ. प्रदीप बुक्कावार, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव डॉ. अशोक पतकी, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष वसंतराव थोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, हे रक्त साठवणूक केंद्र नागरिकांचा जीव वाचविणारे केंद्र ठरावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय सुरू करण्यात आले. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने कॅन्सर रूग्णालय आपण मंजूर केले. मेडीकल कॉलेज उत्तम बनविण्याचे आपले प्रयत्न आहेत. यासंदर्भात नुकतीच मी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी भेट घेतली आहे. जिल्हयातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतींचे बांधकाम अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण पुर्ण केल्या. या प्रा.आ. केंद्राच्या माध्यमातुन देण्यात येण-या आरोग्य सेवेचे बळकटीकरण करावे यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. कोरोना काळात केलेले उत्तम कामाबाबत त्यांनी डॉ. बुक्कावार यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती होती.