लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील पक्षाघात व कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
या अंतर्गत शंकर देवाजी पिपरे (पक्षघात) मु.पो. सोमनाथपुर् वार्ड राजुरा, रुपेश सुधाकर धोटे (कॅन्सर), मु.पो. पांढरपौनी ता. राजुरा, अविनाश मुर्लीधर वाडगुरे (कॅन्सर) मु.पो.पिंपळगांव ता. कोरपना यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्षा सविता टेकाम, माजी जि.प.सदस्य उत्तमराव पेचे, सुरेश पा. मालेकर, विनोद झाडे, रेखा घोडाम यास लाभार्थी कुटुंबिय उपस्थीत होते.