लोकदर्शन 👉By : Ashokkumar Bhagat
गडचांदूर :
बिरसा मुंडा मंडळ, तळोधीद्वारा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी सप्तरंगी ध्वजाचे तसेच बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ता सुरेश आत्राम व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. स्वप्नील गुळधे यांनी सामाजिक परिवर्तन तथा क्रांतिवीर शेडमाके यांच्या जीवनचरित्रावर यथोचित मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन सामाजिक परिवर्तन व आर्थिक मुक्ती करावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश आत्राम यांनी केले. यावेळी बामसेफचे इंजि.निरंजन डांगे, इंजि.संदीप कांबळे , प्रा.रवि वाळके, मारोती सोयाम , हर्षल नामवाड ,सरपंच ज्योती जेनेकर,रवींद्र गोहोकार ,आनंदराव कुबडे,पोलीस पाटील गोहोकार,बापूजी आत्राम,आनंदराव टेकाम,रविंद्र कुळमेथे,गोरखनाथ लांडगे,नानाजी जेनेकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर मडकाम,मारोती उईके,कवडू टेकाम,दिनेश टेकाम,अविनाश आत्राम,विश्वास कोडापे,अनिल कुंभारे,रवींद्र टेकाम बंडू उईके,प्रकाश जुलमे,साईनाथ कोडापे,कांताबाई आत्राम,मनिषा टेकाम यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन अजीत साव, आभारप्रदर्शन शैलेश लोखंडे यांनी केले.