लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर :
राज्याचे पूर्व मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते मान. देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे दिले म्हणून त्यांना चौकशीची नोटीस जारी करण्याच्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकारच्या सायबर सेल पोलिसांनी फडणवीसांना पाठविलेल्या नोटिसीचे दहन केले. भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ठाकरे सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा नेते पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.