लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर:,,
कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरगाव येथे “बाल आनंद” मेळावा व महीला मेळावा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, त्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार कळावेत, यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक बाळा आगलावे यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत तळोधी येथील सरपंच ज्योती जेनेकर तर अध्यक्ष म्हणून उपसंरपच राजकुमार चतुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भोयगाव केंद्र प्रमुख नामदेवराव बावणे, रोशन पिल्लेवान , सुधाकर ठाकरे, देविदास नैताम पत्रकार हबीब शेख,यांची उपस्थिती लाभली. या बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, खेळण्या, शालोपयोगी वस्तू यांची दुकाने मांडली होती. या उपक्रामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात चांगलीच भर पडेल असे मत सर यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्यांनी तसेच पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. परिसरातील नागरिकांनी बाजारात येऊन वस्तू मुलांकडून खरेदी करत कौतुक केले. याB कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष अनिल गेडाम,सदस्य पुरुषोत्तम आस्कर ,ममता गेडाम ,शिक्षक तसेच कर्मचारी वृंद, पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते