लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर (दि.10 मार्च2022)
*सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दि.10मार्च 2022रोजी * *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचा व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.*
*याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. धर्मराज काळे सर, प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक श्री. संजय गाडगे, राजेश मांढरे, एन. के. बावनकर, कु. उमरे मॅडम , ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकासांडे सर उपस्थित होते. .
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री प्राचार्य धर्मराज काळे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सामोरे जाणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा देतांना, “विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून विविध क्षेत्रात भरारी घ्यावी, आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना ओळखून जीवनात प्रगती साधावी हे सर्व करतांना सकारात्मक विचार मनात बाळगावे असे विचार व्यक्त केले.*
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.गाडगे सर आपले विचार मांडताना, “विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून चांगल्या ज्ञानाचा संग्रह करावा, आपले ध्येय समोर ठेवून यशाचे उंच शिखर गाठावे त्याच वेळी आपल्या शिक्षकांना विसरू नये, विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करुन परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या.*
*मार्गदर्शन पर बोलतांना श्री मांढरे सर यांनी,” विद्यार्थ्यांनी निरंतर शिक्षणाची कास धरून अपयश जरी पदरी पडले तरी खचून न जाता प्रयत्नशील रहावे व केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नावलौकिक मिळवावा” असे विचार प्रस्तुत केले.*
*प्रास्ताविक पर मार्गदर्शनातून महेंद्र कुमार ताकसांडे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना,” विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य शिक्षकांनी केलेले आहे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील जीवनात करावा व आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन जोमाने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास मनात बाळगावा” असे विचार व्यक्त केले.*
*या प्रसंगी श्री. पाटील सर यांनी आपल्या बहारदार शैलीतून प्रेरणादायी गीत सादर करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कुं. उमरे मॅडम, कु. शंभरकर मॅडम,यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगते व्यक्त केली. त्यांच्या मनोगतातून शाळेविषयी, शिक्षकांविषयी आदरभाव व कृतज्ञता दिसून आले.*
*प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचे विद्यार्थी कु. समीक्षा केळझरकर या विद्यार्थिनीने केले तर उपस्थितांचे आभार कु. प्रियंका केळझरकर या विद्यार्थिनींने मानले.*
*कार्यक्रमाला श्रीमती चवरे मॅडम, जी एन बोबडे एन के बावनकर, ज्योती चटप, व शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका वृंद, , शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*