लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे
कार्यसम्राट आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून व ना श्री शंकरराव गडाखसाहेब जलसंधारण मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे सदर कामांची मागणी केली होती आटपाडी तालुक्यातील पळसखेल व उंबरगाव साठवण तलावासाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पळसखेल व उंबरगाव येथील पाझर तलाव सन 1972 मध्ये रोहयो योजनेअंतर्गत करण्यात आले होते. या तलावाची गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून गळती होत होती. त्यामुळे उंबरगाव व पळसखेल येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी या दोन्ही तलावाची गळती काढण्याची मागणी
कार्यसम्राट आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे केली होती. त्यामुळे लोकांच्या या मागणीचा विचार करून याठिकाणी साठवण तलाव केल्यामुळे पाणीसाठा क्षमतेमध्ये वाढ होऊन शेतीला पाणी मिळणार आहे. तसेच सध्या आटपाडी तालुक्यामध्ये टेंभूचे पाणी आलेले आहे. त्यामुळे या तलावामध्ये
टेंभूचे पाणी सोडल्यानंतर पाणीसाठा क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. भविष्यात आटपाडी तालुक्यातील अनेक पाझर तलावांचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचे नियोजन
कार्यसम्राट आमदार अनिलभाऊ बाबर यांचे आहे.
खानापूर – आटपाडी तालुक्यासह मतदारसंघाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून काढण्याचे प्रचंड मोठे काम टेंभू योजनेच्या पूर्णत्वामुळे येत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचासुद्धा उपयोग शेतकरी बांधवाच्या शेतीसाठी झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका कार्यसम्राट आमदार अनिलभाऊ बाबर यांची नेहमी असते. याचाच एक भाग म्हणून आमदार अनिलभाऊंच्या विशेष प्रयत्नातून आटपाडी तालुक्यातील पळसखेल व उंबरगाव साठवण तलावासाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.