लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*बल्लारपूर-वर्धा नागपूर पर्यंत तर अमरावती -वर्धा पॅसेंजर बल्लारशापर्यंत चालवावी*
*⭕आनंदवन एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेस दररोज तर काझीपेठ-पुणे आठवड्यातुन 3 दिवस चालविण्याची मागणी*
चंद्रपूर:- चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना कोरोना संक्रमण काळापासून अनेक महत्वाच्या रेल्वे गाड्या आतापर्यंत सुरू न झाल्यामुळे प्रचंड त्रास तसेच मानसिक, शारीरिक व आर्थीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यापूर्वी सुरू असलेल्या व हल्ली बंद असलेल्या रेल्वे गाड्या सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह अन्य महत्वपूर्ण विषयावर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्या मुंबई येथील दालनात सविस्तर चर्चा केली.
दि. 09 मार्च 2022 रोजी महाप्रबंधक कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत हंसराज अहीर यांनी चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांपुढे अनेक महत्वपूर्ण रेल्वे गाड्या अजुनपर्यंत सुरू न झाल्याने निर्माण झालेल्या अडचणींकडे रेल्वे महाप्रबंधकाचे लक्ष वेधतांना बल्लारपूर-वर्धा पॅसेंजर नागपुरपर्यंत चालविण्यात यावी व अमरावती-वर्धा ही पॅंसेंजर बल्लारपूर पर्यंत वाढविण्याची मागणी केली. कोरोना कालावधीमध्ये प्रवाशांच्या सुविधांसाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारने देशात या गाड्या पूर्ववत सुरू केल्या परंतू चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना सुविधाकारक असलेल्या अनेक महत्वपूर्ण गाड्या अजुनपावेतो सुरू न झाल्याने या दोन्ही जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या बाबींकडे लक्ष वेधतांना हंसराज अहीर यांनी काजीपेठ-मुंबई आनंदवन एक्स्प्रेस वाया वर्धा, काजीपेठ-मुंबई ताडोबा एक्स्प्रेस वाया आदिलाबाद पूर्ववत सुरू करून दररोज चालविण्यात यावी काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस आठवड्यातुन 3 दिवस चालवावी तसेच काजीपेठ-नागपुर एक्स्प्रेस जी कोरोना कालावधीपासून बंद असल्याने ती पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी सुचना केली. यावेळी महाप्रबंधकांनी सुचनांची योग्य दखल घेवून या संबंधात लवकरच प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्याची ग्वाही दिली.
सदर बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.