लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
राजुरा (ता.प्र) :- -महाराष्ट्र शासनाने un 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदान योजना लागू केली परंतु या योजनेत अनेक दोष असल्याने 2021 मध्ये डीसीपीएस योजना बंद करून एनपीएस योजना अमलात आणली परंतु या दोन्ही योजना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारमय करून वृद्धापकाळामुळे अनेक आर्थिक सामाजिक समस्या निर्माण करणारी आहे याकरिता महाराष्ट्र शासनाने राजस्थान व दिल्लीत सरकार प्रमाणे 1982/84 ची जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.1 जानेवारी 2004 नंतर सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना राजस्थान सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. पेन्शन कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असून तो भविष्याचा आधार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन ने केली असून या संदर्भात माननीय आमदार एड. अभिजित वंजारी यांच्या मार्फतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना असोसिएशनने निवेदन दिले आहे
यावेळी गोंडवाना यंग टीचर्स चे सचिव डॉ. विवेक गोरलावर,विभाग समन्वयक प्रा.राजेंद्र गोरे प्रा. रुपेश कोल्हे ,डॉ.अभय लाकडे डॉ. किशोर कुडे ,डॉ. नंदाजी सातपुते डॉ. प्रमोद बोधने यांनी आमदार ऍड.अभिजित वंजारी यांना संघटनेची भूमिका समजावून निवेदन दिले आहे.