By : Shankar Tadas
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यांतर्गत तसेच जिल्ह्यांतर्गत स्थलांतरित लाभार्थी यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा लाभ देणे या विषयावर विशेष अँप तयार करुन अभ्यासपूर्ण कार्यक्रम तयार केल्याबद्दल जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मित्ताली सेठी (भा.प्र.से.) यांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनी “विशेष पुरस्कार ” प्रदान करून मान्यवरांचे हस्तें यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्राालयाजवळ ,मुंबई येथे दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब (ऑनलाइन माध्यमातून), उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते तर महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमतीताई ठाकूर, राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, श्रीमती आय.ए.कुंदन(भा.प्र.से.), आयुक्त, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, श्रीमती रुबल अग्रवाल (भा.प्र.से.), आयुक्त, महिला व बाल विकास, श्री.राहुल मोरे, तसेच सन्मा.पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.