लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
⭕*माजी आमदार अँड.संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती*
ॲड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात आज दि.8 मार्च 2022 रोज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजुरा शहरातील ज्या स्त्रियांनी कोरोना काळात उत्कृष्टपणे कामगिरी बजावली त्या स्त्रियांचा सत्कार समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला.
यावेळी पहिल्या सत्कारमूर्ती वेणू नामदेव नुत्तलवार हेड कॉन्स्टेबराजुरा,तसेच दुसरे सत्कारमूर्ती परिचारिका विद्या परचाके आरोग्य विभाग,राजुरा तसेच तिसरे सत्कारमूर्ती अनिता इप्पावार स्वच्छता कर्मचारी नगर परिषद ,राजुरा यांचा सत्कार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी कालेश्र्वरवार,पर्यवेक्षिका रेणुका देशकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापिकांचाही मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.संजय धोटे यांनी महिलांचे महत्त्व पटवून दिले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालींकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.संजय धोटे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविलेले संस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे ,वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी कालेश्र्वरवार, महाविद्यालयाचे प्राचार्य इर्शाद शेख,डॉ.दिनेश दुर्योधन ,पर्यवेक्षिका रेणुका देशकर तथा इतर प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य इर्शाद शेख,संचालन प्रा.नझीर सय्यद तर आभार प्रा.मंगेश कुळमेथे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वृंद तथा कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.