लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕एकुण ४५ गावातील ४८ कि. मी. च्या पांदन रस्त्याची होणार कामे.
राजुरा (ता.प्र) :– महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पांदन रस्ते योजना अंतर्गत सन २०२२ – २०२३ या वर्षाच्या आराखड्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली असून आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा विधानसभा क्षेत्रातील पांदन रस्त्यांसाठी १५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत क्षेत्रातील एकुण ४५ गावातील ४८ कि. मी. च्या पांदन रस्त्याचे निर्माण कार्य सुरू होणार आहेत. यामध्ये राजुरा तालुक्यातील १४ , कोरपना तालुक्यातील १८ , गोंडपिपरी तालुक्यातील ९ आणि जिवती तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे.
त्यामुळे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पांदण रस्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतशिवारी ये जा करण्यासाठी, त्यांच्या सोयी सुविधेसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या पांदण रस्ते विकास योजनेमुळे क्षेत्रातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूरांना याचा लाभ मिळणार असून स्थानिक नागरिकांची पांदन रस्त्यांची सातत्याची मागणी पूर्ण होणार आहे. सदर शेत / पांदण रस्त्यांची कामे मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभियानातून, राज्य रोहयो पूरक कुशल अनुदान उपलब्ध करून पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे क्षेत्रातील शेतकरी बांधवांची मोठी अडचण दूर होणार आहे अशी माहिती लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.