लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या महिला कक्ष व सांस्कृतिक विभागाच्या वतीने *”स्त्रियांच्या बलस्थानांचा शोध”* या विषयावरती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले सदर चर्चासत्राच्या प्रमुख मार्गदर्शन स्थानावरून प्राचार्य डॉ. शाक्य यांनी स्त्रिया मध्ये असलेल्या अंतर्भूत गुणांना वाव देऊन त्यांना पुढे आणून त्यांच्यात दडलेले सुप्त गुण व कर्तुत्व हे पुढे आणणे व त्याला ओळखणे ही काळाची गरज आहे असे मत प्रतिपादन केले तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यात प्रा. डॉ. पानघाटे यांनी वास्तववादी राहून समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श घेऊन मार्ग क्रमित करावा. तसेच तळागाळात वास्तव्यास असणाऱ्या परंतु कर्तबगार, कर्तृत्ववान स्त्रीयांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकण्याचे काम चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी केले.यानिमित्त महाविद्यालयात कार्यरत स्त्री कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सदर चर्चासत्र करिता संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. देशमुख प्रा. तेलंग यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रा. मुंडे,मस्कले, वासाडे ,मंगाम साबळे, कांबळे, वाकळे, शिंदे मेश्राम ,पिंपळकर ,मोहितकर, बिरादर, नले तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.सदर चर्चासत्राचे संचालन प्रा. राऊत तर आभार प्रा.लांडगे यांनी मानले चर्चासत्र यशस्वी रित्या संपन्न होण्यास शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले..