लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
आजच्या काळात मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनून नावलौकिक करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन प्राचार्या सौ स्मिता चिताडे यांनी स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले,
प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी स्कालर अकॅडमी च्या प्राचार्या सौ,रश्मी भालेराव, संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम .सी. व्ही. सी.विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे,प्रा. नंदा भोयर,प्रा. आरजू आगलावे,प्रा.प्रगती आगे, होत्या.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महिला दिन चे महत्त्व अतिथीनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा, सुरेखा ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, माधुरी पेटकर यांनी केले.याप्रसंगी प्रा, आशिष देरकर, प्रा, बाळू उमरे,प्रा, संगीता गिरी,प्रा, चेतना कामडी, प्रा, तब्बू शेख, प्रा, मंजुषा टेकाम तथा विद्यार्थी नी उपस्थित होत्या.