लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच पातळीवर आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा गडचांदूरचा तरुण कलाकार म्हणजेच लेखक व दिग्दर्शक अनिकेत परसावार. दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावे ही महत्वाकांशा प्रत्येक रंगकर्मीला असते आणि हीच आशा अनिकेतच्या मनाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भिडली.
कॉलेजमध्ये असताना व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटके केलीत. ‘कलंक’ (The information of HIV Aids) ही फिल्म जिल्हा पातळीवर निवड होऊन, चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील काही भागात प्रोजेक्टरच्या माध्यमाने फिल्म विद्यार्थ्यांना दाखवून, जनजागृती करण्यात आली आणि इथूनच अनिकेतच्या कामाला दिशा मिळाली. त्यानंतर लहान मुलांना पैसे बचतीची सवय लागण्यासाठी “मिनी बँक” ही फिल्म बनवली. या फिल्मला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद लाभला. तसेच भूतियापा, 8 months daughter आणि अनेक सामाजिक व राजनैतिक ad films त्यानी केले. या सर्व फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन अनिकेतनेच केले होते.
त्यानंतर ओळख झाली फिल्म राईटर व डायरेक्टर शैलेश दुपारे. त्यांच्या “पल्याड” या फिल्म मध्ये शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, विरा साथिदार, देवेंद्र दोडके आणि रूचीत निनवे समेत अनिकेतने आर्ट डायरेक्टर तसेच अससिस्टंट म्हणून काम केले. या फिल्मला समीक्षक तसेच रसिकांनी उचलून धरले आणि भारताबाहेरसुद्धा फिल्म फेस्टिवल मध्ये निवड करण्यात आली. समोर डायरेक्टर संजीव मोरे यांच्या सोबत “निबंध” या फिचर फिल्म मध्ये नाळ फेम श्रीनिवास पोकळे समेत अनिकेतने पुन्हा एकदा आर्ट डिरेक्टरची भूमिका निभवली. सध्या तो विदर्भाच्या संस्कृतीवर आधारित असलेल्या “डफ” या फिचर फिल्ममध्ये सक्रिय आहे.
आज पर्यंतच्या धावपळी विषयी प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधताना अनिकेतने शेवटी सांगितले की, नाटके किंवा फिचर फिल्म्स करताना जबाबदारी असते. पण आपण स्वतःहून निर्णय घेतलेल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय याचे मला समाधान असल्यामुळे ही धावपळ हवी हवीशी आहे. या धावपळीतून मला आनंद, ऊर्जा मिळत असल्याने मला थकवा कधीच जाणवत नाही असे अनिकेत परसावार यांनी सांगितले.