लोकदर्शन👉 मोहन भारती –
नांदा”÷गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे ज्ञान स्त्रोत केंद्र, विद्यार्थी विकास, राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मार्च २०२२ ला गुरुकुल महाविद्यालयात जागतिक महिला दिन व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ.अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर ,ग्रंथपाल प्रा.सचिन करणेवार ,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.प्रशांत पुरानिक, डॉ.राजेश डोंगरे,प्रा.नानेश्वर धोटे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनिल मुसळे यांनी आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात अग्रेसर होत असून ,त्यांनी अधिक प्रभावीपणे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे मनोगत व्यक्त केले. प्राचार्य आशिष पईनकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन करणेवार प्रास्ताविक प्रा.नानेश्वर धोटे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.प्रशांत पुराणिक यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.सुशांत खिरटकर, श्री.संतोष चौधरी, श्री.शालिक कांबळे, श्री.सविन मडावी, श्रीमती ननिता बुराण प्रशांत नवले व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.