लोकदर्शन 👉 महादेव गिरी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि.7 मार्च सोमवार रोजी संपन्न झाला. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेशजी संजयजी ,साडेगावकर, आर.बि.राठोड, एम.एस.गिरी, एस.ए.महाडिक, डि.खर.नाईकनवरे, व्हि.एन.बोंडे, जि.एम कावळे, सौ.एस.आर.सोनवणे आदिं उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर राजेश जी साडेगावकर व मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेश साडेगावकर,एस.डि.भोकरे , बि.व्हि.बुधवंत ,एम.एस.गिरी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थी व प्रमुख अतिथी,शिक्षक यांनी सहभोजन करुन विद्यार्थ्यांना निरोप दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि.व्हि.बुधवंत यांनी केले तर आभार एस.ए.महाडिक यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळिराम शेंबडे, विषणु पंडित यांनी परीश्रम घेतले.