आज 8 मार्च : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…जगप्रसिद्ध स्त्रीवादी महिलांचे धाडसी विचार

 

लोकदर्शन संकलन -👉 साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
8 मार्च 2022.

स्त्री-पुरुष समानतेच्या सशक्त टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कारण, लिंग समानतेचा मार्ग आणि त्यातील बदल सतत होत असतात. वंश, वर्ग, लिंग आणि लैंगिकता या चार मार्गाने आपण तो प्रवास माणसाला समृद्ध करता येतो आणि माणूस आजच्या आधुनिक काळात तो करत आहे. याच टप्प्यावर जगावर आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव पाडणाऱ्या स्त्रीवादी महिलांचे विचार खूप बळ देऊ शकतात. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे विचार आपण जाणून घेऊयात…

१) “स्त्रीवादाचा अर्थ महिलांना सशक्त बनविणे असा नाही. त्या पूर्वीपासूनच सशक्त आहेत. फक्त स्त्री सशक्त आहे, हे जगाने समजून घेत दृष्टीकोन बदलला पाहिजे.”

– जी. डी. अँडरसन, स्त्रीवादी लेखिका, ऑस्ट्रेलिया.

२) “मी माझा आवाज वाढवते, तेव्हा ओरडते असं समजू नका. तर आवाज नसलेल्यांना ते ऐकू यावे, यासाठी मी ओरडते. कारण, जेव्हा आपल्यापैकी अर्ध्या जणांना मागे ठेवून पुढचा प्रवास केला जातो ना… तेव्हा आपण यशस्वी होऊ शकत नाही.”

– मलाला युसूफजाई, सामाजिक कार्यकर्त्या, अफगाणिस्तान.

३) “जर एखादी महिला मुक्त नसेल तर, मी एक स्त्री म्हणून स्वतंत्र असली तरी मुक्त नाही. जरी तिच्यावरची बंधनं माझ्यापेक्षा वेगळी असली तरीही…”

– ऑड्रे लाॅर्ड, स्त्रीवादी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या, अमेरिका.

४) “माझा विकसित करण्यासाठी मला बराच वेळ खर्च करावा लागला आहे. आता तो आवाज विकसित झाला आहे, त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही.”

– मॅडेलिन अल्ब्राइट, अमेरिकेच्या प्रसिद्ध राजकीय नेत्या.

५) “मला असा समुदाय निर्माण करायचा आहे, जिथं सर्वच वंशातील स्त्री एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतील. एकमेकांना साथ देतील आणि एकमेकांची काळजी घेतील. स्त्री ही एक शक्ती आहे, हे सांगण्यासाठी आणि तिची ताकद अनुभवण्यासाठी हा समुदाय महत्त्वाचा आहे.”

– बियाॅन्से, जगप्रसिद्ध गायिका, अमेरिका.

संकलन … साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
8 मार्च 2022.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *