लोकदर्शन विभागय (प्रतिनिधी ) 👉 राहुल खरात
आटपाडी ;
थोर साहित्यकार डॉ शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्त कथा लेखन स्पर्धा परिवर्तन विचार मंच ने आयोजित केली आली आहे. मराठी साहित्य रत्न , थोर साहित्य कार डॉ शंकर राव खरात यांचे २०२१ ते २०२२२ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. परिवर्तन विचार मंच त्यांच्या जन्म दिवसापासून शंकरराव खरात यांना विविध कार्यक्रमा अंतर्गत त्यांची आठवण केली आहे. त्यांना अभिवादन केले. त्यांचे त्यांच्या आटपाडी जिल्हा सांगली येथे स्मारक झाले पाहिजे या करिता विविध माध्यमातून पाठपुरावा केला आहे. विविध साहित्य संमेलन मधून ठराव संमत करून महाराष्ट्र शासन कडे पाठविला आहे. हाच साहित्यविषयक उपक्रमाचा भाग म्हणून कथा लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. कमीत कमी नऊशे शब्दात आपली कथा पाठवा. कथा ही सामाजिक बांधिलकी ची असली पाहिजे. प्रथम तीन कथा ना रोख रक्कम, प्रमाणपत्र, देण्यात येणार आहे. सहभागी सर्वांना सन्मान प्रमाण पत्र देण्यात येतील. प्रवेश नि शुल्क आहे. दिनांक २० /३/२०२२ पर्यंत पाठवा. ====================== संपर्क विलास गजभिये ९४२१५८८९०१, विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली . लेखिका सुजाता लोखंडे नागपूर, दिलिप कांबळे रावेर जळगाव. विद्या नरवाडे औरंगाबाद, हेमराज भगत चिपळूण रत्नागिरी, राजेश शिर्के मुंबई, ___________________________