लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,,
आजच्या धावपळीच्या युगात वाहनाचे प्रमाण वाढले असून यामुळे सडक अपघाताचे प्रमाण वाढले असुन त्यामुळे गाडी चालवितानी सडक सुरक्षतेच्या नियमाचे पालन करण्यात यावे, जीवन रक्षा व्हावी यासाठी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे ए.सी.डब्ल्यु मॅराथॉन आवारपूर दौंडचे आयोजन अल्ट्राटेक चे युनिट हेड, श्रीराम पी.एस. व व्यवस्थापक कर्नल दीपक डे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
ही दौड अन्नपूर्णा मैदान ए.सी.डब्ल्यू. ते आवारपूर बस स्टाप पर्यंत होती. यामध्ये अल्ट्राटेक कॉलनीतील रहिवासी, सभोवतालील गावातील रहिवासी त्यामध्ये पुरूष, महिला व मुलांचा सुध्दा सहभाग होता. या कार्यक्रमाला विशेष करून युनिट हेड, श्रीराम पी.एस., ललीत देवपुरा, सौंदीप घोष, कर्नल दिपक डे व विभाग प्रमुख तसेच आवारपूर, नांदा, बीबी, नोकरी व पालगाव या गावातील सरपंच/उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.
यामध्ये बँनर, पोस्टर, संगीत द्वारे सडक सुरक्षेचा संदेश देण्यात आला. सहभाग्यांना टी – शर्ट सुध्दा प्रदान करण्यात आल्या तसेच २० गरजू गावातील लोकांना क्रॅश हेल्मेट युनिट हेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा द्वारा सडक सुरक्षेचा संदेश देण्यात आला व आवारपूर दौड च्या महिला, पुरुष व बालक वर्गातील प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषक वितरण करण्यात आले
सर्व सहभागी झालेल्यांनी या कार्यक्रमाची मनसोक्त प्रशंशा केली. श्री. शिवाजी इंग्लिश स्कूल, नांदा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सडक सुरक्षा वरती संदेश सुद्धा दिला. ग्रामपंचायत आवारपूर यांनी आवारपूर बस स्टॉप वरती सर्व सहभाग्यांना पिण्याच्या पाण्याची व स्वागताची उत्तम अशी तयारी केली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदळे तसेच एडमिन, सेक्युरिटी, ई.आर., सेफ्टी,सिव्हिल, ए.बी.पी.एस.स्कुल व मेडिकल सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.