लोकदर्शन संकलन 👉- साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
6 मार्च 2022.
आपण नखे कापण्यापासून त्यांची निगा कशी राखत येईल याची काटेकोरपणे काळजी घेतो. मात्र, नखांमध्ये होणाऱ्या बदलांकडे आपले लक्ष नसते. जर आपण नखांचे रंग आणि आकारातील बदलांकडे लक्ष दिले तर आरोग्याच्या अनेक समस्या ओळखू शकतो. नखांचे बदललेले रंग-रुप आरोग्याशी संबंधित काय समस्या दर्शवितात, हे जाणून घेऊया.
१. पिवळ्या रंगाची नखे
जर आपली नखे पिवळी होत असतील तर सावध व्हा. फिकट पिवळ्या रंगाचे नखे अशक्तपणा, हृदयरोग, कुपोषण आणि यकृत विकारांबाबतची लक्षणे आहेत. कधीकधी फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे पांढरे किंवा पिवळे दिसतात.
२. निळी नखे
जेव्हा शरीरात ऑक्सिजन योग्य प्रमाणात नसतो तेव्हा नखे निळी होतात. ही समस्या हिवाळ्यात सहसा दिसून येते. खरं तर, थंडीच्या दिवसात बोटाच्या रक्तवाहिन्या आकुंचन झाल्यामुळे नखांमध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही आणि ती निळी होतात. या समस्येला रेनॉड्स फॅनोमेना म्हणतात. ही समस्या न्यूमोनिया, हृदयरोग किंवा फुफ्फुसांच्या संसर्गामुळे देखील होऊ शकते.
३. पांढरी नखे
फिकट गुलाबी नखांचा रंग पूर्णपणे पांढरा झाला, त्यावर डाग दिसू लागले तर, यकृत, हृदय, मधुमेह किंवा आतड्यांसंबंधी रोगाची ही लक्षणे असू शकतात.
४. लाल आणि जांभळा रंग
नखांचा लाल रंग उच्च रक्तदाब दर्शवितो आणि जांभळा रंग कमी रक्तदाब दर्शवितो.
५. जाड आणि खडबडीत नखे
जाड आणि खडबडीत नखे रोग प्रतिकारशक्ती कमी होण्याची लक्षणे आहेत. जाड आणि खडबडीत नखे देखील सोरियेसिस आणि फंगल इंफेक्शन दर्शवितात.
६. नखांवर पट्ट्या येणे
नखांवर एकापेक्षा जास्त पांढरे पट्टे मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण आणि शरीरात पोषक तत्वांचा अभाव असल्याचे लक्षणे आहेत.
७. अर्धी सफेद आणि अर्धी गुलाबी नखे
जर नखे अअर्धी सफेद आणि अर्धी गुलाबी दिसत असतील तर ते मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
*नखं सांगतात ‘तुमचं आरोग्य कसं आहे?*
नखं हे तुमचं सौंदर्य खुलविण्यात भर घालतं. नखांच्या सौंदर्यासाठी आपण खूप काही करतो. आजकाल नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का हे नखं तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी संकेत देतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत.
नखांच्या सौंदर्यासाठी (Nails) महिला खूप वेळ देतात. अगदी पार्लरमध्ये (Parlour) जाऊन पैसे खर्च करतात. पण तुम्हाला माहिती आहे, या नखांचा संबंध तुमच्या सौंदर्याशी तर आहेच, तसंच या नखांवरून तुम्हाला आरोग्याचे संकेतही मिळतात. हो! अगदी बरोबर. नखांवरून तुम्हाला आरोग्यासंबंधीत एक प्रकारे अलर्ट मिळतो. चला तर जाणून घेऊयात या नखांचा आणि आरोग्याचा काय संबंध आहेत.
कोणत्या लक्षणांचे काय अर्थ?
पांढऱ्या रेषा – नखांवर असलेल्या पांढऱ्या रेषा या तुम्हाला किडनीसंबंधित समस्येबद्दल तुम्हाला संकेत देतात. त्यामुळे अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन यासंबंधीत माहिती द्या.
सॉफ्ट नखे – जर तुमची नखं सॉफ्ट आणि कमजोर वाटतात आहे, तर हे लिव्हरशी आजाराचे लक्षण आहे. किंवा शरीरात आयर्नची कमी असू शकतं. म्हणून डॉक्टरांकडे जा आणि काही टेस्ट करुन घ्या.
पिवळी नखे – जर तुमची नखे पिवळी पडली आहेत. तसंच ती सतत तुटत आहे तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण तुम्हाला फंगल इन्फेक्शनची समस्या असू शकते.
कोमजलेली नखे – कोमजलेले नखे हे लक्षण डायबिटीज आणि लिव्हरशी संबंधित आहे. तसंच हे लक्षण म्हणजे तुम्हाला एनीमियाचा त्रासही असू शकतो.
काळ्या रेषा किंवा डाग – तुमच्या हाताच्या किंवा पायाच्या नखावर काळा डाग असेल तर तुम्हाला मेलेनोमा असू शकतो. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करा.
नखांवर निळे डाग – शरीरात योग्यप्रमाणात ऑक्सिजनची कमी असल्यानेही असं डाग पडतात. म्हणजे असे डाग असणे म्हणजे तुम्हाला फुफ्फुसाची समस्या असू शकते.
त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जा आणि त्यांना यासंबंधित माहिती द्या. त्यामुळे आपल्या नखांकडे लक्ष देणे गरजेचं आहे. नखांच्या सौंदर्यासोबत त्यात होणारे बदल हे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी संकेत देतात. ही लक्षणे तुम्हाला ओळखणे महत्त्वाची आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच यासाठी मदत करेल. जर तुम्हाला यापैकी कुठलेही लक्षण आढळल्यास घाबरून न जाता एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. काळजी घ्या आणि निरोगी राहा!
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
6 मार्च 2022.