लोकदर्शन प्रतिनिधि 👉
गडचांदूर — अख्या महाराष्ट्रात नेहमी कुठल्या ना कुठल्या चर्चेत असलेल्या नगर परिषद गडचांदूर हद्दीत विविध फंडातून कोटीचे कामे मंजूर करून मोठं मोठे नेत्यांना बोलावून दर्जेदार बॅनर लावून उदघाटन करण्यात आले.परन्तु ते काम चालू आहे की नाही , बंद असतील तर कुठल्या कारणाने व काही कामे मुदत सम्पूनही चालू का झाले नाही ? होत असलेले काम योग्य व दर्जेदार होत आहे का ? हे पाहने जरी कायदेशीर अधिकार नगर परिषद प्रशासनाचा असली तरी तेवढीच जबाबदारी लोकप्रतिनिधी ची असते परन्तु यावर लोकप्रतिनिधी गप्प का ? असा सवाल भाजप पक्ष्याचे विरोधी नगरसेवक डोहे यांनी केला.
शहरात मागील अनेक वर्षा पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सौंदरीकरणाची मागणी होत असल्याने त्या ठिकाणच्या सौंदरीकरनचे काम न प कडून मंजूर करण्यात आले व ठेकेदारांला कामाचा कार्यदेश देण्यात आला. उदघाटन करून काही महिन्याने कॉलम चे खड्डे खोदून कॉलम उभे केले.परन्तु मागील दोन महिन्यांपासून सदरचे काम पूर्णता बंद पडले आहे.प्रभाग क्र 5 मधील बुऱ्हाण व डोहे नगरातील ओपन स्पेस चे सौंदरीकरन काम दोन – तीन महिन्यापासून बंद पडले आहे.
प्रभाग क्र दोन मधील स न 104 मुसा लेआऊट मधील ओपन स्पेस सौंदरीकरण च्या कामाला दीड वर्षा पूर्वी ठेकेदाराला कामाचा कार्यदेश दिला व मुदत सुद्धा संपली परन्तु त्याठिकाणी अजूनही कामाला सुरुवात करण्यात आली नाही.याच प्रभागात एक नवीन बोरवेल मंजूर करण्यात आले व ठेकेदाराला कार्यदेश देण्यात आला.मुदत संपत आली परन्तु अजूनही बोरवेल मारण्यात आले नाही.
शहरातील इतर चालु असलेले ओपन स्पेसचे सौंदरीकरण काम मंदगतीने चालू असून दिलेली कालावधी निघून गेलेली आहे.
वैशिष्ठ पूर्ण योजनेतील 2.10 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यदेश माहे 23 डिसेंम्बर 2021 रोजी देण्यात आले.परन्तु अजूनही काही कामाची सुरुवात झालेली दिसत नाही.तरी शहरातील बंद असलेले कामे त्वरित चालू करावे व मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारा कडून दंड वसूल करण्याची मागणी विरुद्ध विरोधी नगरसेवक डोहे यांनी न प च्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सविधांनीक मार्गाने आंदोलन /मौचा /उपोषण सारखा मार्ग अवलंबवु असा इसारा सुद्धा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.आता यावर मुख्याधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.