आज पलूस शहरात जिल्हा परिषद शाळा नंबर 1, शाळा नंबर 2, शाळा नंबर 3 मध्ये युद्धविरोधी मानवी साखळी संपन्न* *350 विद्यार्थी व 30 शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग

लोकदर्शन 👉 राहुल खरात


आज ५ मार्च२०२२ रोजी पलुस शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर 1, शाळा नंबर 2, शाळा नंबर 3 मधील सुमारे 350 विद्यार्थी,शिक्षक आणि पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील निवडक शिक्षकांचे प्रतिनिधी मिळून युद्धविरोधी मानवी साखळी करण्यात येऊन जगावरले युद्धाचे सावट कमी करा,युद्ध नको,शांतता हवी अशा घोषणा देण्यात आल्या. या मानवी साखळीतील सहभागी सर्व विद्यार्थी,शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे हातात हात धरून युद्ध नको शांतता हवी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना मानवी साखळीचे संयोजक मारुती शिरतोडे म्हणाले कि यापूर्वी झालेली जगातील दोन महायुद्धे आणि त्याचे परिणाम लक्षात घेऊन 1948 साली युनोने मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात जगातील बालकांना व सर्व मानव जातीला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्यात येऊन युद्धा सारखी आपत्ती कधीच येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे जगाला आवाहन करण्यात आले होते. तरीही पुन्हा एकदा 74 वर्षांनी रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे जगावर तिसर्‍या महायुद्धाचे सावट पसरलेले आहेत आणि सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या दोन राष्ट्रांच्या युद्धामुळे बरीच निष्पाप बालके आणि निवासी नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.अनेक राष्ट्रांना ही युद्धाची झळ बसतआहे.तेव्हा युद्ध थांबवा शांतता हवी असा संदेश या मानवी साखळीतून जगभरातील देशोदेशीच्या राज्यकर्त्यांना जावा या उद्देशाने ही लहान शालेय मुलांची मानवी साखळी केलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या युद्धविरोधी मानवी साखळी ला पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे व पलूस पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रतिनिधी अरुण कोळी,शमीम नदाफ यांनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.या मानवी साखळीत जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण, शाळा नंबर 2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शाळा नंबर 3 च्या प्रभारी मुख्याध्यापिका वंदना सनगर सह दुधोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल नरदेकर, शिक्षक मारुती शिरतोडे ,संभाजी पाटील, जगन्नाथ शिंदे,संगीता पाटील, विशाखा ढेरे, स्मिता लाड, वनिता कांबळे यांच्यासह सांडगेवाडी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील ,पलूस कॉलनी शाळेचे लक्ष्मण शिंदे, आमनापूर शाळा नं 2 च्या सारिका गंभीर, कुंडल जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे ज्ञानेश्वर रोकडे ,पद्मानगर शाळेचे नारायण माळी,तुपारी जिल्हा परिषद शाळेचे सचिन पोळ, जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी चे प्रवीण पाटील ,जिल्हा परिषद शाळा नंबर 2 वसगडे चे उत्तम कांबळे , भिलवडी जि.प.शाळेच्या सविता सत्यांन्ना जि.प.शाळा सुखवाडी च्या सुषमा देशमाने, जिल्हा परिषद शाळा औदुंबरच्या जयश्री गुरव, जिल्हा परिषद शाळा मळीभाग अंकलखोप च्या सरोज गुरव, जिल्हा परिषद शाळा पुणदीचे विश्वासराव पाटील, जिल्हा परिषद शाळा इंगळेवस्ती चे महादेव माळी,जिल्हा परिषद शाळा सावंतपुर वसाहतच्या पुष्पा राजे,शीतल पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *