लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी:👉 महेश कदम
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पं. डाॅ. विठ्ठलराव पाटील सैनिक स्कूल चे पाच प्रशिक्षित घोडेस्वार विद्यार्थी आणि जवळपास ७० विद्यार्थी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे चढाई करून मोहीम फते केली.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना आगळी वेगळी मानवंदना देत एकुण २३२ किलोमीटर परतीचा प्रवास करत हे पाच मावळे परतले आहेत.
“जय भवानी जय शिवाजी” असा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. छत्रपतींच्या मावळ्यांची आठवण करून देणारा हा अश्वारूढ प्रवास इतिहासाची आठवण करुन देणारा होता.
घोडेस्वारी प्रशिक्षक दीपक ढोणे आणि त्यांच्या सहकार्यातून हे खडतर आव्हानाचे प्रदर्शन झाले. त्या सोबत शिखरावर अंतिम चढाई करून शाळेचा ध्वज फडकवून छत्रपती शिवरायांना मान वंदना देण्यात आली. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वाच्य शिखर असून या शिखराची उंची समुद्र सपाटी पासून १६४६ मीटर आहे.
या मोहिमेसाठी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार. डाॅ. सुजय दादा विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सह सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक लीलावती सरोदे आणि शाळेचे कमांडंट कर्नल डाॅ. भरत कुमार, ज्योती कौशिक, प्राचार्य राजेश माघाडे यांनी अभिनंदन केले. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक ढोणे सर, निनाद कांबळे, क्रिश मराठे, वेदांत शेवाळे, अथर्व काळे, अथर्व अरविकर, रुशिकेश गोळे, प्रणय घाटे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या उपक्रमासाठी रमेश दळे, संजय तांबे, दत्तात्रय शेळके, प्रतीक दळे, संतोष घोलप, शकील पठाण, संदीप जाधव, महेश अनाप, योगेश निर्मळ आदिंनी परिश्रम घेतले.