वालुर/ प्रतिनिधी÷ महादेव गिरी
वालुर येथील जि.प.प्रा.कन्या शाळा येथे केंद्रीय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करुन राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी मुख्याध्यापक बळिराम धरणे होते तर उदघाटक म्हणून शाळा व्यवस्थापन अध्यक्ष स्वाती भोकरे उपस्थित होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश तोष्णीवाल, राजेश साडेगावकर, रामेश्वर पाथरकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, उदघाटक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते थोर शासत्रज्ञ सि.व्हि.रमण यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अरपण करण्यात आला. या केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकावन्न प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. या विज्ञान प्रदर्शनास तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी साबळे, अरुन राऊत, केंद्र प्रमुख मैफळ सर यांनी भेट दिली. उतक्रष्ट प्रयोगांना केंद्र प्रमुख मैफळ यांच्या कडून पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डि.डि.रोकडे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.एस.देशमाने, बि.एम.घुगे,डि.डि.रोकडे,के.एम.गिलडा,एस.ए.गायकवाड, डि.के.बेले,डि.यु.सोळंके, सौ.पि.पि.नवगिरे,एस.ए.मोरे,यु.एस.पाटील,एस.आर. दोडे आदिंनी परीश्रम घेतले.