लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
⭕*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक*
वरोरा : शहरातील अस्तित्वातील योजना सन १९७२ पासून कार्यान्वित असून प्रकल्पातील लोकसंख्या २२ हजार ४०० साठी सन २००२ पर्यंत होती. योजनेचे आयुष्य ४८ वर्ष झालेले आहे. वरोरा शहराची सन २०११ ची लोकसंख्या ४६ हजार ५३२ एवढी असून शहराचे आधुनिकीकरण व औद्योगीकरण वसाहतीमुळे पाणी पुरवठा मागणी वाढलेली असल्याने नगर परिषद वरोरा यांच्या मागणीनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नागपूर मुख्य अभियंता सुशीर जी, एम. आय. डी. सी. अधीक्षक अभियंता आकुलवार, एम. आय. डी. सी. कार्यकारी अभियंता कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, नगर परिषद वरोरा मुख्य अधिकारी भोयर, कार्यकारी अभियंता बालधारे, जी. एम. आर व साई वर्धा येथील अधिकारी व नगरसेवक राजू महाजन यांची उपस्थिती होती.
या बैठकीत साई वर्धा, जी. एम. आर कंपनीने मरडा बॅरेजचे पाणी वरोरा नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजनेस देऊन हि योजना त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्या. हि योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळेल. सद्य बहुतेक ठिकाणी ट्युब्वेलने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हि बहुप्रतीक्षित वाढीव पाणीपुरवठा योजना लवकरच सुरु होणार आहे.