लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २७/०२/२०२२ :-* सोलापूर शहर हे कामगारांचे शहर असुन या शहरात बंद झालेले ताडी दुकाने चालु करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार हा ताडीचा व्यसनदिन होऊन देशोदडीला लागणार आहे. म्हणुन ताडी दुकाने त्वरित बंद करा. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांना महाराष्ट्र कामगार सेना व ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मा. कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालय व उत्पादन शुल्क् मंत्रालंयाकडून सन २०२१ – २२ सालाच्या ताडी (शिंदी) धोरणात एक सदस्यीय समितीव्दारे पामवाईन या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ताडी दुकाने सुरु करण्याचे अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यानुसार सोलापूरात प्रशासनाच्या वतीने ताडी दुकाने ताडी ठेकेदारांना चालू करण्याचे परवाना दिले आहेत. तत्पुरर्वी ताडी दुकाने पामवाईनच्या नावाने चालु होणार अशी माहिती समजल्यावरुन यापूर्वी सोलापूरात ताडी दुकानात ताडी पिल्याने शेकडो युवक व नागरिक मरण पावले त्यामुळे अनेक महिला व युवती हे विधवा झाल्याचा घटना घडला त्यामुळे सोलापुरातील सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, आणि नागरिकांनी ताडी दुकाने चालू करु नये. अशी तक्रार मा.जिल्हाधिकारी, मा अधिक्षक उत्पादन शुल्क् सोलापूर मा. पोलिस आयुक्त् सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदन दिली. त्याचबरोबर मा. मुख्यमंत्री, स्वीय सहाय्य्क, मा. पाणीपुरवठा व स्वच्छातामंत्री गुलाबराव पाठील साहेब, मा. कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेब, प्रधान सचिव (मुख्यमंत्री), मा. उत्पादन शुल्क् प्रधान सचिव, मा.श्री दत्ता मामा भरणे पालक मंत्री सोलापूर जिल्हा व २८८ आमदारांना निवेदने देण्यात आले. अशा प्रकारे सोलापूरात ताडी दुकांना विरोधात सुरु असलेला विरोध लक्षात घेऊन मा. पालकमंत्री श्री. दत्ता मामा भरणे यांनी ताडी दुकानांना स्थागिती दया असा तोंडी आदेश मा. जिल्हाधिकारी यांना दिली. तरीही मा. जिल्हाधिकारी साहेब आणि उत्पादन शुल्क् अधिकारी यांनी कोणतेही ठोस करावाई केली नाही. त्यामुळे खुले आमपणे दाट लोकवस्तीत ताडी दुकाने चालू आहेत. म्हणून सोलापूरच्या जनतेमध्ये ठाकरे सरकार म्हणजेच महाविकास आघाडी सरकार बदनाम होत आहे. नव्हे तर मा. जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क् अधिक्षक यांनी ठाकरे सरकार म्हणजेच महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न् करीत आहे. भविष्यकाळात होणारे निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ताडी दुकाने पूर्णपणे बंद करणेच योग्य् ठरणार आहे.
तरी माननीयांनी वरील सर्व मुददयांचा गाभिर्याने विचार करुन सन २०२१ – २२ च्या ताडी दुकाने चालू करण्याचा धोरणाबाबत पुर्नविचार घेणे गरजेचे आहे. म्हणून याबाबत गृहमंत्रालय आणि उत्पादन शुल्क् विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची उच्चस्थरीय बैठक आयोजन करावे ही नम्र विनंती. असे नमुद करण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री यांना निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर, गणेश बोड्डू, सोहेल शेख, गुरूनाथ कोळी आदिंचा समावेश होता.
=========================
*फोटो मॅटर :- मा. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना ताडी विरोधात निवेदन देतांना विष्णु कारमपुरी (महाराज), विठ्ठल कुऱ्हाडकर दिसत आहेत.*