लोकदर्शन 👉 मोहन भारती
आरोपी लोकसेवक उल्हास मधुकरराव जवळेकर, वय 46 वर्ष, व्यवसाय नोकरी महसूल सहाय्यक, तहसील कर्यालय,भोकर जि. नांदेड येथे . रा. पवार कॉलनी भोकर जि. नांदेड
याला लाचलुचपत पथकाने धाड टाकुन रंगेहात पकडले,.
त्याच्या विरुद्ध दिनांक 22/02/2022 रोजी तक्रार प्राप्त झालीं होती.
लाचमागणीची पडताळणी दिनांक 25/02/2022 रोजी करण्यात आली. व त्याने
दिनांक 28/02/2022ला लाचस्वीकारली
लाचेची मागणी:- 50,000/- रुपयाची करण्यात आली होती ,परन्तु तडजोडीअंती 40,000/-ची लाच स्वीकारले.
लाच मागण्याचे कारण :- यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जमीन तक्रारदार यांचे पत्नीचे व मुलांचे नावे फेरफार करण्याकरीता संबंधित तलाठी यांना आदेश काढण्यासाठी 50,000/- रु. लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40,000/- रु. स्वतः स्वीकारले होते.
सदरील कारवाई डॉ. श्री राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड
श्री धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनात करण्यात सली
श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड
सापळा अधिकारी :
श्री अशोक इप्पर , पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड
सापळा पथक:- सपोउपनी संतोष शेट्टे पोना एकनाथ गंगातीर्थ, ईश्वर जाधव, मारोती सोनटक्के,शेख मुजीब लाप्रवि नांदेड
————————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,स्नेहनगर पोलीस वसाहत नांदेड .
*@ दुरध्वनी क्रं. 02462-253512
*@ मोबा.क्रं. 7350197197
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================