लोकदर्शन 👉 राहुल खरात
मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिच्या अनेक बोलीभाषा आहेत या भाषेचा उगम साधारण दोन हजार वर्षांपूर्वी झालेला असल्याने या मराठी भाषेने अनेक पिढ्यांचा इतिहासाचे संचित टिकवण्याचे व पुढे नेण्याचे काम केले असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा अशी एकमुखी मागणी पलूस केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केली. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा यांची संयुक्त बैठक केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथील उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे यांनी विशद करताना मराठी भाषेत वि वा शिरवाडकर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचेसह अनेक नामांकित लेखकांनी जी साहित्यसंपदा निर्माण केलेली आहे व मराठीचे महत्व जगभर पोहोचवले आहे. मराठी भाषेला अलंकारिक शब्दांनी सजवण्याचे काम इथले साहित्यिक नेहमीच करीत असतात.या मराठी भाषेत एकोणीस बोली भाषा असून या सर्व भाषा माणसाचे संवादाचे प्रभावी माध्यम असून भाषेचे हे संचित टिकवायचे असेल तर बोलीभाषा व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्व थरातून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनीधींनी केंद्रसरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा अशा मागणीचा एकमुखी ठराव संमत केला. या बैठकीला जिल्हा परिषद शाळा नं१ बांबवडे येथील शिक्षक व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड, बांबवडे शाळा नं. 2 येथील पात्र पदवीधर शिक्षक व प्रभारी केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे,पद्मा नगर शाळेचे नारायण माळी, श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयाचे सागर तावरे,भारती विद्यापीठ प्रशालेचे ओंकार पवार,जि.प.शाळा कोयना वसाहत च्या उज्वला वागावकर, जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील,जिल्हा परिषद शाळा बौद्ध वसाहत च्या इंदूताई जुगूळकर, जनता प्राथमिक विद्यालयाच्या वैशाली कोळेकर, जिल्हा परिषद शाळा नं.3 पलूस च्या वंदना सनगर ,जिल्हा परिषद शाळा मोराळे च्या तेजल शितापे, डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल चे बाबासाहेब नदाफ ,शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेचे हनुमंत मंगसुळे, जिल्हा परिषद शाळा आंधळी चे हिम्मतराव गोरड, जिल्हा परिषद शाळा नं.1 पलूस चे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण,आंधळी हायस्कूलचे रमेश गायकवाड व पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे आदींची उपस्थिती होती.