लोकदर्शन 👉 महेश गिरी
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत असलेल्या भटक्या विमुक्त कल्याण विकास मंडळाचे अध्यक्ष तथा निती आयोगाचे सदस्य मा.श्री दादासाहेब ईदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारच्या भटक्या विमुक्त आर्थिक सक्षमीकरण योजना SEED च्या प्रगटीकरण प्रसंगी विचार मंथन बैठक रवीभवन, नागपूर येथे आज दि.२७.२.२०२२ रोजी करण्यात आली होती.या प्रसंगी भटके विमुक्त हक्क परिषद चा वतीने महेश गिरी (विदर्भ अध्यक्ष), दयालनाथ नांनवटकर (जिल्हा अध्यक्ष नागपुर), नितेश पूरी (जिल्हा अध्यक्ष भंडारा), विजय आगरकर (सचिव नागपूर), प्रविण पाचगे (उपाध्यक्ष नागपूर), गोवर्धन बडगे (उपाध्यक्ष नागपूर)
यशवंत कातरे(जिल्हा संघटक), अंकित पवार (जिल्हा संघटक) यांनी मा.ईदाते साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.संघटनेचे एक निवेदन मा.श्री ईदाते साहेब यांना देण्यात आले.ज्यात
*१) भटक्या विमुक्त जमाती ची जमातनिहाय जनगणना करने*
*२) नाँनक्रीमीलेअर ची मर्यादा १२लक्ष करने*
*३) केंद्राच्या सेवेत व शैक्षणिक संस्था मध्ये भटक्या विमुक्त जमाती ची स्वतंत्र जमाती यादी व स्वतंत्र आरक्षण लागू करने*
*४) आदीवासी प्रमाणे सोई सुविधा, योजना व बजेट भटक्या विमुक्त जमाती च्या सार्वागीन विकासासाठी केंद्राने लागु कराव्यात* , यासाठी भटक्या विमुक्त कल्याण विकास मंडळाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी,अशी निवेदन मध्ये विनंती करण्यात आली.