बल्लारशाह पिटलाईनचे काम पूर्णत्वाकडे….

Lokdarshan : Shivaji selokar

बल्लारपूर येथील सुरु असलेल्या पिटलाईन (थर्ड लाईन) च्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता मार्च महिन्या अखेर पिटलाईन चे का पूर्ण होणार असल्याचे सांगितले. या लाइनमुळे यापुढे बल्लारशाह, चंद्रपूर मार्गे थेट मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व अन्य मेट्रो शहरांकडे रेल्वे गाड्या सुरु होणार. या पिटलाईनमुळे बल्लारशा रेल्वे स्थानकाचे वैभव वाढेल, हे फार महत्वाचे व महत्वाकांक्षी काम पूर्णत्वाकडे येत असल्याने आनंद व्यक्त केला. या लाईनचा अभाव असल्याने यापूर्वी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाठपुरावा करून मेट्रो शहराकडे काझीपेठ वरून गाड्या सोडण्याची व्यवस्था केली होती. यावेळी सोबत भाजपा नेते चंदनसिंग चंदेल, समीर केने, देवा वाटकर, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे दामोदर मंत्री, श्रीकांत राजूरकर, श्रीनिवास सुंचूवार, रामेश्वर पासवान तसेच रेल्वेचे अधिकारी व अभियंता आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here