लोकदर्शन आटपाडी दि . २७ (प्रतिनिधी )👉 राहुल खरात सर
*⭕सादिक खाटीक, स्नेहजीत पोतदार, संभाजीराव गायकवाड .
हजारो वर्षापासून बोलल्या, लिहील्या जाणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक असून मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठी भाषा ज्ञानभाषा बनली पाहीजे . मातृभाषा मराठी असणारांनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहीजे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष स्नेहजीत पोतदार आणि सुप्रसिद्ध कथाकार संभाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले .
एस.टी . महामंडळाच्या आटपाडी आगारातल्या एस .टी . बस स्थानकात आज मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला . त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हे मान्यवर बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख सदाशिवराव कदम हे होते .
यावेळी मेजर शंकर जाधव, वाहतुक नियंत्रक शिवाजी मोटे, वाहतुक निरीक्षक संजय माने, किशोर दळवी, बाळासाहेब देशमुख गुरुजी, सुधीर देशपांडे, गिरीश डोंगरे, विजय ताटपुजे,संजय साळुंखे, आदिती सुर्यवंशी, नीलम लोखंडे, आरोग्य विभागाच्या रेणूका बेलकर, कीर्ति केदार, महेश खरात, सुर्यकांत जाधव, सुधीर पाटील, भारत बनसोडे, गणेश देशमुख, रियाज शेख, अजित शिंगाडे इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
आटपाडी एस.टी . आगाराचा मराठी भाषेच्या गौरवाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक, स्नेहजीत पोतदार, संभाजीराव गायकवाड यांनी, राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर वि .दा .सावरकर, यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब , शरद पवार साहेब इत्यादी हजारोंनी मराठी भाषेला समृद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करून, एस.टी . कर्मचारी, अधिकारी, यांसह सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या . मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठीतूनच शिक्षण दिले पाहीजे,सर्व व्यवहार, सर्व कामकाज मराठीतूनच झाले पाहीजे . मराठी माऊलीनेच हजारोंना जगमान्य उंची मिळवून दिली आहे . मराठी भाषेच्या लेकरांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्न केले पाहीजेत . मराठीतून ज्ञानदान देणाऱ्या सर्व व्यवस्थांना राजाश्रय मिळाला पाहीजे . समृद्धी दिली गेली पाहीजे. असे मत या मान्यवरांनी व्यक्त केले .
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने महान साहित्यीक कवी कुसुमाग्रज आणि आटपाडी तालुक्याचे माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे यांच्या स्मृतिस अभिवादन करून सादिक खाटीक, स्नेहजीत पोतदार, संभाजीराव गायकवाड यांनी, मराठीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या ग.दि.माडगुळकर, व्यंकटेशतात्या माडगुळकर, शंकरराव खरात, ना . सं . इनामदार, औंधाचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी या आटपाडी च्या सुपुत्रांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवून या भागाला, भाषेला मोठे महत्व प्राप्त करून दिले . माजी केंद्रिय मंत्री श्री .राम नाईक, लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर , एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेल मुंबईचे संपादक श्री . राजीव खांडेकर, दिग्दर्शक म .गो .पाठक बांबासारख्या शेकडोंनी आटपाडी, माणदेश आणि मराठी भाषेला मोठी उंची मिळवून देण्याचा प्रयत्न केला . मराठी आमची आई – माँ – माऊलीच असल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्राच्या दळणवळणाची रक्तवाहीनी असलेल्या एस.टी . ला मोठी समृद्धी यावी . संपातल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत सामील व्हावे . आणि कोट्यावधी प्रवाशांची उत्तम सेवा बजावणाऱ्या एस . टी . च्या चालक, वाहक, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यात राज्य शासनाने तातडीने पावले टाकावीत . असा आशावाद ही सादिक खाटीक, स्नेहजित पोतदार आणि संभाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केला .
गेल्या पाच वर्षापासून आटपाडी एस.टी आगाराच्या माध्यमातून आम्ही मराठी राजभाषा दिन साजरा करीत असून प्रवाशी सेवा ही परमेश्वरी सेवा मानुन एस.टी.चा प्रत्येक कर्मचारी काम करीत असल्याचे आटपाडी एस.टी . आगाराचे आगार प्रमुख सदाशिवराव कदम यांनी आपल्या अध्यक्षीत भाषणात मत व्यक्त केले .
प्रारंभी स्वागत प्रास्तावीक सुधीर देशपांडे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार गिरीश डोंगरे यांनी मानले .