लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिओ रविवार असून, ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येत आहे. येथील रुग्णालयात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लस पाजून अधिकार्यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ठिकाणी केंद्र सुरू केले आहेत. शाळा, अंगणवाडी,चौक, मंदिर सभागृह आदी ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, शंभर टक्के बालकांना ही लस दिली जाणार आहे. आपल्या बालकांना ही लस पाजून घ्यावी, असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.