लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना. वसंतराव नाईक विद्यालय,कोरपना येथे क्रांतीसुर्य स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वार्षिक बक्षीस वितरण सोहळा चे आयोजन करण्यात आले, विद्यालयात वर्षभर अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासच्या हेतूने, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,एकल नृत्य, देशभक्तीपर गीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, शालेय विज्ञान प्रदर्शनी,प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, इत्यादी स्पर्धेत प्रथम,द्वितीय, तृतीय ,क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भाऊराव पा. कारेकर,होते,प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक तथा प्राचार्य डि. जी.खडसे. गणेश गोडे.कुकडे, पर्यवेक्षक पि. बी. बोंडे.विजय बोरडे.साधूजी बावणे, अनिल काकडे. शेषराव मने.होते, प्राचार्य खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्याकरीता तसेच विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना चालना मिळण्यासाठी व देशाभिमान व सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे.असे सांगितले, पि. बी बोंडे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन पि. बी. बोंडे यांनी केले तर. आभार के.डी. घुगूल यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन राजू लांडगे.विलास धोटे. अशोक गवसे.सुभास जोगी. यांनी केले वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.