लोकदर्शन 👉 महादेव गिरी
कृषी विभाग महाराष्ट्र शासन मार्फत वालुर येथे जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सेलू च्या वतीने करण्यात आले .सदर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन वालुर येथिल प्रगतिशील शेतकरी व सरपंच संजय साडेगावकर यांच्या शेतात करण्यात आले, सदर कार्यक्रमामध्ये श्री.कच्छवे कृषि उपसंचालक परभणी हे बोलत होते यावेळी त्यांनी चर्चासत्रा मध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग पी एम एफ एम ई योजने बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, जुने हळद प्रक्रिया युनिट नॉन ओ डी ओ पी मध्ये अर्ज करणे बाबत शेतकऱ्यांना आव्हान केले .याकरिता शासनाकडून 35 टक्के किंवा 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणार असल्याचे सांगितले , तसेच तालुका कृषी अधिकारी सेलू आनंद कांबळे यांनी फळबाग नियोजन व कृषी विभागाच्या योजना बद्दल माहीती दिली.
कृषी सहाय्यक संदीप शेळके यांनी इतर शेतकऱ्यांनी प्रगतिशील शेतकरी संजय साडेगावकर यांच्या शेतीला भेट देऊन कृषी विभागाच्या योजनांची सांगड घालून त्याप्रमाणे नियोजन कसे करावे व आपली शेती सुधारणा कशी करावी याबाबत माहिती जाणून घ्यावी व नियोजन करावे असे आव्हान केले.
यावेळी सदर प्रक्षेत्र भेटीदरम्यान मंडळ कृषी अधिकारी सेलू आर. जी. खरात ,कृषी पर्यवेक्षक दिगंबर फुलारी , एस डी पजई, एम एस डोंबे,तांत्रिक कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काळदाते ,पत्रकार अझर पठाण ,कृषी सहाय्यक – पी आय पवार ,बलभीम आवटे,अनिल घुमरे ,सुहास धोपटे,विलास कुंभार ,बापू सिरसाट ,आत्म थोरे,सुरेश खोतकर ,माणिक समीदरे, भगवान वाघ ,इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कृषी मित्र विजय चव्हाण,राजेश साडेगावकर , सचिन वालूरकर, यांनी कार्यक्रम यशवशीतेकरिता परिश्रम घेतले