लोकदर्शन👉मोहन भारती
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून वार्षिक बक्षीस वितरण सोहळा व संत गाडगेबाबा जयंती हा सयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यालयात वर्षभर अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासच्या हेतूने, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,एकल नृत्य, देशभक्तीपर गीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, शालेय विज्ञान प्रदर्शनी,प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, इत्यादी स्पर्धेत प्रथम,द्वितीय, तृतीय ,क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्याकरीता तसेच विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना चालना मिळण्यासाठी व देशाभिमान व सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे. आणि या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी पर्यवेक्षक संजय गाडगे राजेश मांढरे,नामदेव बावनकर, सुरेश पाटील, कु. ज्योती चटप, भालचंद्र कोगरे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चंद्रकांत घाटे,सुषमा चवरे,सीताराम आत्राम, संकल्प भसारकर, शशिकांत चन्ने इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र कुमार ताकसांडे तर आभार प्रदर्शन राजेश वासेकर यांनी केले.