लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २५/०२/२०२२ :-* सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री.हरिष बैजल साहेब यांनी तृतीय पंथ किन्नरांना काम मिळवून देऊन मानवतेचे दर्शन घडविले त्यामुळे त्याचे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चांदीची देवीची मुर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मा.पोलीस आयुक्त श्री.ग
हरिष बैजल साहेब यांनी अलीकडेच सोलापूरचे शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी अनेक धडक कारवाई केली आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योग्य ठिकाणी बदल्या करून कर्तृत्वाची चुनुक दाखविली. यामध्ये शहरातील नागरिक सुरक्षित व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे सवय लावून दिले.हे सर्व पोलीस म्हणून करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व कामात व्यस्त राहूनही समाजातील दुर्लक्षित असलेला घटक म्हणून ओळखला जाणारा तृतीय पंथ (किन्नरांना) सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी त्याना जमणारे काम मिळवून दिले.हे कार्य अत्यंत मानवतेचे अजान शत्रूचे आहे.संताच्या भाषेत बोलायचे म्हणजे “”जे का रंजिले गांजिले त्यास म्हणे आपुले साधू ते तोची ओळखावा देव ते तोची जागावा”” असा म्हणता येईल या महान विचाराचे व अष्टपैलू कलावृत्ती असलेले पोलीस आयुक्त श्री.हरिष बैजल साहेबांचा महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेचे चांदीचे मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
सदर प्रसंगी पोलीस उपायुक्त :- वैशाली कडुकर मॅडम, पोलीस उपायुक्त :- दिपाली घाटे मॅडम, उपायुक्त :- बांगर साहेब, अँड :- मुनिनाथ कारमपुरी, रेखा आडकी, राधिका इप्पा, लक्ष्मीबाई इप्पा, गुरुनाथ कोळी, नागार्जुन कुसुरकर, सलीम शेख, यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========================
*फोटो मॅटर :- महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तृतीय पंथी (किन्नरांना) काम मिळवून देऊन मानवतेचे दर्शन घडविल्याबद्दल मा.पोलीस आयुक्तांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेचे चांदीचे मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सदर प्रसंगी अँड :- मुनिनाथ कारमपुरी, रेखा आडकी, आदी दिसत आहेत.*