लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
कोरपना तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागातर्फे नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे,उपसभापती सिंधूताई आस्वले,जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर,नारंडा ग्रामपंचायत सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंबे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
सदर शिबिराचा लाभ हा समाजातील गरजू नागरिकांपर्यत पोहचला पाहिजे तसेच त्यामाध्यमातून समाजातील वंचित घटकांना आपण न्याय देऊ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांनी केले.
या शिबिरात एकूण ३४२ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.या शिबिरात नारंडा व परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दीक्षा ताकसांडे,डॉ.गोडबोले,निलेश साउरकर,सेवाकर टोंगे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.