लोकदर्शन 👉 मोहन भारती
*चंद्रपूर*:-भारतीय परिवार बचाओ संघटना चंद्रपूर यांचे शिष्टमंडळ पत्नी पीडीत पुरुषांची समस्या घेऊन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना निवेदन सादर करण्यात आले.साहेबाना पुरुष्यांच्या समस्या बाबत अवगत केले पुरुषावरही महिला अत्याचार करतात हे आता समाजाला कळायला लागले त्यावर समाधानकारक, सकारात्मक,व्यापक चर्चा झाली शिस्तमंडळात भारतीय परिवार बचाओ संघटना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सुदर्शन नैताम,ऍड धीरज ठवसे,मोहन जीवतोडे,सचिन बरबटकर,नितीन चांदेकर,गंगाधर गुरनुले,वसंता भलमे, स्वप्नील गावंडे,पिंटू मुन आदी उपस्थित होते.
महिलेच्या संवरक्षणाकरिता अनेक कायदे आहेत त्याच कायद्याचा गैरवापर करून पुरुषांना व सासारला घायल करण्याचे काम पद्धतशीर योजनाबद्ध रीतीने पत्नी व तिचे आई वडील करीत आहे.कायद्याने हुंडाबळी चा खुळखुळा महिलांच्या हातात दिला आहे त्याचा गैरवापर करीत अनेक कुटुंब उध्वस्त करीत आहे यावर आळा बसायला हवा पत्नी आपले पाप लपविण्या करीत पती व ससारचा बळी घेतो समाजात पुरुषालाच दोष देण्याची पद्धत आहे परंतु पत्नी घरात काय उपद्व्याप करते हे समाजाला माहीत असते काय. त्यात भर टाकतात तिचे आई वडील व मोबाईल मुलीच्या संसारात आई वडिलांच्या हस्थक्षेपामुळे संसार उधवस्थ होत आहे.”हर महिला बेचारी नही,हर पुरुष अत्याचारी नही”.स्त्री पुरुष यांच्या करीता समान कायदे असायला हवे.महिलांना महिला आयोग आहे,बालकल्याण आयोग आहे,जनावरकरिता पशुकल्याण आयोग आहे परंतु शासनाला पुरुष लक्षात नसावा की त्याचेकरिताही पुरुष आयोग हवा.सद्यस्थितीत महिलांच्या खोट्या तक्रारी वाढत आहे त्याची पोलीस प्रशासनाद्वारे जमिनी स्तरावर संपूर्ण चौकशी करूनच कार्यवाही करावी करण ऐका चुकीच्या निर्णयाने कुटुंब उधवस्थ होण्याची भीती असते.तेव्हा स्त्री पुरुष समान कायदा व पुरुष आयोग व्हावा हीच मागणी.