पंचायत समीती पोंभुर्णाचे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

लोकदर्शन पोंभुर्णा (चंद्रपूर) :👉 अविनाश पोईनकर

 

⭕देशमुख, सेमले, मडावी, उगलमुगले, मेश्राम, बहाकर, साळुंखे, बोरसरे मानकरी

⭕८ मार्चला होणार पुरस्कार प्रदान सोहळा

चंद्रपूर जिल्ह्यातील आय.एस.ओ नामांकित व पंचायत राज पुरस्कृत पंचायत समीती पोंभुर्णा आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमशिलतेसाठी प्रसिद्ध आहे. विकासाभिमुख कार्यामुळे राज्य व विदर्भपातळीवर मानाचे पुरस्कार मिळवत छाप सोडली आहे. साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे व वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हा मुख्य उद्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांचा असून राज्यातील साहित्यिकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना प्रोत्साहन म्हणून राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार आयोजन करण्यात आले होते. नुकतेच सन २०१९ ते २०२१ या वर्षातील राज्य वाङ्मय पुरस्कार पं.स.सभापती अल्का आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यमापन समीती मार्फत संयोजक गटविकास अधिकारी, कवी धनंजय साळवे यांनी जाहीर केले आहे.

चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांच्या ‘गर गर भोवरा’ व गडचिरोलीच्या कवयित्री मालती सेमले यांच्या ‘रानपाखरं’ या बालकवितासंग्रहांना राणी हिराई वाङ्मय पुरस्कार, मुलचे कवी प्रब्रम्हानंद मडावी यांच्या ‘आम्ही कोणत्या देशात राहतो ?’ व नाशीकचे कवी विवेक उगलमुगले यांच्या ‘आतला आवाज’ कवितासंग्रहांना क्रांतीसुर्य बिरसामुंडा वाङ्मय पुरस्कार, चंद्रपूरच्या लेखिका स्व.साजीदा शेख-मेश्राम यांच्या ‘तमोल्लंघन’ आत्मचरित्रास मरणोत्तर व अकोलाच्या लेखिका लता बहाकर-तळोकर यांच्या ‘बळीराणी’ कादंबरीस क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके वाङ्मय पुरस्कार, रत्नागिरीचे डॉ.रमेश साळूंके यांच्या ‘हुंकार’ व गडचिरोलीचे प्रमोद बोरसरे यांच्या ‘पारवा’ कथासंग्रहास राजे हिरशहा आत्राम वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

रोख दोन हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र पुरस्काराचे स्वरुप असून ८ मार्च रोजी महिला दिनानिमीत्त आयोजित पंचायत समीती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, सभापती अलका आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पं.स.सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद प्रभाकर जोशी, डॉ.पद्मरेखा धनकर, अविनाश पोईनकर, नरेशकुमार बोरीकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सदर कार्यक्रसाठी विजय वाटेकर, सुधाकर कन्नाके, लक्ष्मण सोनूले, सतिश वाढई, देवीदास कन्नाके, मिलेश साकुरकर, रश्मी पुरी, सुरेंद्र इंगळे तथा पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

 

••••••

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *