आटपाडी ग्रामपंचायतच्या धडाडीच्या सरपंच वृषाली पाटील यांचे नवीन कामे सुरू करण्याचे आदेश

 

लोकदर्शन आटपाडी 👉;राहूल खरात सर

आटपाडी गावातील सुजान जनतेने ज्या विश्वासाने गावाची जबाबदारी सोपवली त्याच विश्वासाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आटपाडी गावातील सर्व जनतेच्या सहकार्याने व आमदार श्री. अनिलभाऊ बाबर तसेच जिल्हा बँकेचे संचालक श्री. तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी ग्रामपंचायत 15 वा वित्त आयोगंगाच्या निधीतून रक्कम रुपये 65 लाख रुपये खर्च करून नवीन रस्ते करणे, बंदिस्त गटर करणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे ,अशा प्रकारची नवीन तब्बल 26 विकास कामे संपूर्ण आटपाडी गावातील सर्व वार्ड नंबर 1 ते 6 मध्ये कामे सुरू करण्याचे आदेश सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले. सरपंच पाटील यांच्या आदेशान्वये २ ते ४ दिवसांमध्ये खालील सर्व विकासकामे सुरु होऊन नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यात ग्रामपंचायतला यश येणार आहे.
वार्ड नंबर १ प्रकाशवाडी- दिघंची रोड ते मनोज चव्हाण घर बंदिस्त गटर करणे व पेव्हिंग ब्लॉक चा रस्ता करणे
वार्ड नंबर प्रकाशवाडी- बँक ऑफ इंडिया पाठीमागे सिद्धनाथ मंदिर परिसर बंदिस्त गटार करणे.
वार्ड नंबर १ शेगदारमळा – मुढेवाडी रोड ते हणमंत पिसे घर रस्ता करणे.
वार्ड नंबर १ गोरडवस्ती – मेटकरी वस्ती रस्ता सुधारणा करणे.
वार्ड नंबर १ मगरवस्ती अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे
वार्ड नंबर २ कोर्ट परिसर निंबवडे रोड वृंदावन हॉटेल परिसर ते धांडोर ओढा वाढीव पाईप लाईन करणे
वार्ड नंबर २ विजयनगर परिसर बंदिस्त गटर करणे
वार्ड नंबर 2 जुगदर घर ते संभाजी पाटील घर वाढिव पिण्याची पाईपलाईन करणे
वार्ड नंबर 3 पाटीलमळा- अंतर्गत बोंबेवाडी रोड ते दिनकर पाटील घर सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे
वार्ड नंबर 3 पाटीलमळा अंतर्गत बोंबेवाडी रोड ते श्रीमंत पाटील घर सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे
वार्ड नंबर 3 पांढरेवाडी अंतर्गत अंगणवाडी ते रावसाहेब चव्हाण घर सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे
वॉर्ड नंबर 3 पांढरेवाडी अंतर्गत बोंबेवाडी रोड ते अशोक चव्हाण घर रस्ता करणे
वार्ड नंबर ४ मशिद परिसर – निजाम इनामदार घर ते मेन रोड बंदिस्त गटर करणे
वार्ड नंबर ४ सदाशिव देशमुख घर ते बुरुड गल्ली बंदिस्त गटर करणे
वार्ड नंबर ४ आनंदराव देशमुख घर ते डॉक्टर विजय पाटील घर बंदिस्त गटार करणे
वार्ड नंबर ४ सुतार गल्ली ते तांबडा मारुती मंदिर बंदिस्त गटर करणे.
वार्ड नंबर ४ ब्राह्मण गल्ली चैतन्य पैठणकर ते सरकारवाडा बंदिस्त गटर करणे.
वार्ड नंबर 5 विनोद दाणी वकील घर ते मेन रोड बंदिस्त गटर करणे व सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे
वॉर्ड नंबर ५ जयवंत माने घर वंजारी मॅडम घर परिसर ते गोविंद बनसोडे घर परिसर बंदिस्त गटर करणे
वॉर्ड नंबर ५ दीपक खटावकर घर रस्ता पेविंग ब्लॉक बसवणे
वॉर्ड नंबर ५ जिल्हा परिषद शाळा नंबर १ परिसर – शिंदे वकील ते मेन रोड रस्ता पेविंग ब्लॉक करणे
वार्ड नंबर ५ ओम शांती कॉलनी – दादा निवास ते जुगदर साहेब घर सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे
वार्ड नंबर ६ बोंबेवाडी रोड ते रानमळा रस्ता करणे
वार्ड नंबर 6 मरगळे वस्ती ते गोंदीरा मळा मुरमीकरण रस्ता करणे
वार्ड नंबर ६ मरगळे वस्ती- संदिपान तळे घर ते चव्हाण सर घर परिसर वाढीव पाईप लाईन करणे
वॉर्ड नंबर 6 मरगळे वस्ती – मनोज मरगळे घर ते पांडुरंग चोपडे घर परिसर वाढीव पाईपलाईन करणे.

वरील २६ कामे सुरू करण्याचे आदेश सरपंच वृषाली पाटील यांनी दिले असून सदर विकास कामे चालू झाल्यावर जनतेने सदर विकास कामांवर बारकाईने लक्ष ठेवून संबंधित इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामे करून घेण्याचे आवाहन ही सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे.

आटपाडी ग्रामपंचायतला आणखीन भरपूर आर्थिक निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे उर्वरित सर्वांचीच विकास कामे वेळेत पूर्ण होतील, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *