लोकदर्शन 👉 मोहन भारती
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांची जयंती कन्हाळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष होते. तर प्रमुख उपस्थिती श्री राजू येरेकर बुथ प्रमुख,श्री प्रवीण भोयर,श्री नितीन हिवरकर, श्री सुरेन्द्र पावडे,श्री दिवाकर गेडाम,श्री पिंटू गेडाम,श्री सुधाकर कव्वलवार,श्री विनोद मालेकर,विशाल कन्नाके,रामदास येरेकर आदी उपस्थित होते .तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला ,गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगांव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. व त्यांना देवाज्ञा 20:12:1956 रोजी झाली .गाडगे महाराज यांचं नाव डेबूजी झिंगाजी जानोरकर होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक होते ,त्यांनी स्वच्छतेत गरीब राहणे स्वीकारले .सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकत होते .गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयावर जास्त रुची होती .त्यांनी अज्ञान,अंधश्रद्धा,भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी-परंपरा, चोरी करू नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे, असे एक महान व्यक्तिमत्त्व असलेले राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणून ओळखले जातात असे. मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. होते कार्यक्रमाचे संचालन प्रवीण भोयर यांनी केले. तर आभार सुधाकर कव्वलवार यांनी मानले.