लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित थोर समासुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतनिमित्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून प्रतिपादन केले. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण व स्वच्छता या तीन गोष्टीवर गाडगेबाबा जास्त भर देत गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचा मूलमंत्र रोवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ग्रामउद्धार हेच प्रगत राष्ट्राचे प्रतीक आहे. आज या गोष्टीचीच गरज समाजाला आहे. समाज वाईट दिशेने मार्गक्रमण करीत आहे. देशाला प्रगती पथावार नेण्यासाठी शिक्षण, स्वच्छता व सुज्ञ विचार गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी गाडगेबाबा यांचा जीवनपट व त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. दैववादी बनन्या पेक्षा प्रयत्नवादी बना या मंत्राचा उपयोग समाजाने आत्मसात करण्याची गरज आहे. असे मत प्रा. तेलंग यांनी व्यक्त केले कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. पानघाटे, प्रा. मंगाम, उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मुंडे यांनी तर आभार प्रा राऊत यांनी मानले. श्री. वाकळे, शिंदे, कांबळे तसेच इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.