लोकदर्शन 👉 मोहन भारती
===================================
गडचांदूर-
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करावे. त्यासाठी शालेय अभ्यासाबरोबरच शाळा, महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांचा विकास करावा. कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन करता येत नाही. असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष डॉ आनंदराव अडबाले यांनी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन बोलताना केले.
वर्ग११वी कडून वर्ग१२वी करिता निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी.सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी डोंगरवार तसेच बांधकाम सभापती तथा नगरसेविका कल्पनाताई निमजे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. काळे, प्रा वांढरे, प्रा जहिर, प्रा मेहरकुरे प्रा खान, प्रा सातारकर, प्रा सुरपाम, प्रा ताजने, प्रा मुप्पीडवार मंचावर उपस्थित होते.यावेळी विशेष अतिथी व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेलतर्फे१०वी व१२वीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोज्वल ताकसांडे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कु. साबिया शेख व कु. शालिनी सांगडे यांनी प्रास्ताविक कु. वंदना मंडाळी हिने तर आभार रोहित पेंदोर ह्याने मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा प्रशांत खैरे, प्रा दिनकर झाडे, प्रा प्रवीण डफाडे, प्रा रमेश सोनटक्के, प्रा गुजर, प्रा पोडे, प्रा भगत, गणपत आत्राम व विद्यर्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.