लोकदर्शन वालूर/प्रतिनिधी 👉 महादेव गिरी
⭕सेलू- मौजे वालूर- हातनुर शिवारातील शिवरस्ता खुला करावा यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
मौजे वालूर- हातनुर गाव शिवारातील शिवरस्ता मोकळा करून देऊन अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांची अडचण दूर करावी यासाठी सोमवारी(ता.२१) तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
मौजे वालूर- हातनुर गाव शिवारातील शिवरस्त्यावर दोन्ही बाजूनी अतिक्रमण झाल्याने शिवरस्ता अरुंद झाला असल्याने शेतकऱ्यांना जा -ये करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.
दरम्यान काही दिवसापूर्वी हा शिवरस्ता खुला करून या ठिकाणी शिवरस्ता करण्यासाठी काही पुढाकार घेतला.तहसील प्रशासन व ग्रामपंचायतने हा रस्ता उभारण्याचे नियोजन करून उद्घाटनही केले.परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर होता.अखेर या रस्त्यासाठी उपोषण करण्याचे निवेदन देण्यात येऊन सोमवारी (ता.२१) सकाळी उपोषण सुरू केले.
तहसीलदार दिनेश झांपले यांना या वेळी निवेदन देण्यात आले.या वेळी मंडळ अधिकारी तानाजी माने उपस्थित होते.
भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांना सदरिल शिवरस्ता दोन मार्चपर्यंत मोजणी करून हद्द कायम करून देण्याचे लेखी पत्र संबंधित शेतकऱ्यांना तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले.
या वेळी शेख बक्शु मिस्त्री,दत्ता रोकडे,नामदेव अबुज,विश्वनाथ रोकडे,राधू रोकडे,ज्ञानेश्वर रोकडे, वाल्मिक काळे,सिताराम धापसे, भिमराव आंधळे, वैभव अबुज, दिपक रोकडे,वाल्मिक पितळे आदी शेतकरी उपस्थित होते.