लोकदर्शन 👉 मोहन भारती
====================================
गडचांदूर-रयतेचे राजे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा निरोप तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष डॉ.आनंदरावजी अडबाले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत सत्कारमूर्तीचे अनभिज्ञ पैलू श्रोत्यांसमोर मांडले.तसेच निवृत्ती म्हणजे जीवनप्रवासाचा शेवट नसून नवीन आयुष्य जगण्याची सुरुवात होय असे सांगत सेवानिवृत्तपर आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव नामदेव बोबडे,संचालक मंदे,श्रीमती नलिनीताई डोहे,प्राचार्य धर्मराज काळे,मुख्याध्यापिका सौ. खोडके, पर्यवेक्षक,श्री गाडगे उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डी.जे. चौधरी,एम.एस.एकरे वरिष्ठ लिपिक आर. टी. डोहे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर सौ. अमला चौधरी,सौ.गिरजा एकरे, सौ. मीना डोहे उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयातील शिक्षिका ज्योती चटप यांचा मुलगा भूषण थिपे यांची अमेरिकेत पीएचडी साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत खैरे, प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. काळे यांनी केले तर आभार भुवनेश्वरी गोपमवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.