लोकदर्शन 👉राहुल खरात सर
पलूस च्या संवेदनशील कार्यकर्त्यांनी “सायकल चालवा प्रदूषण टाळा’ पर्यावरण वाचवा” संदेश देत छत्रपती शिवरायांना केले अनोखे अभिवादन
सांगली जिल्ह्यातील पलूस म्हणजे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेले शहर म्हणून ओळखले जाते. याच पलूस शहराला संतांचा,क्रांतिकारकांचा संगीतकारांचा, विविध कलाकारांचा,विविध क्षेत्रात गाजलेल्या माणसांचा वारसा लाभलेला आहे. अशा शहरात अलीकडील काही वर्षात पर्यावरणप्रेमी नागरिकांचे मोठे संघटन होताना दिसत असून पर्यावरण प्रदूषण टाळणेसाठी दुचाकी सायकल चालवणारांचे प्रमाण वाढीस लागलेले दिसतेय. देशातील वाढत्या महागाईच्या झळा समाजातल्या सर्व घटकांना बसत असून वाढती आर्थिक विषमता सुद्धा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणाला धोकादायक ठरत असल्याचे चित्र निर्माण होत असलेल्या काळात पलूस मधल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांनी, तरुणांनी ,कार्यकर्त्यांनी “सायकल चालवा,प्रदूषण टाळा” सायकल चालवा पर्यावरण वाचवा* असा संदेश देत रोज किमान 25 ते 30 किलोमीटर सायकल नित्यनेमाने चालवून स्वतःच्या तब्येती बरोबरच समाजप्रबोधनाचा वसा घेतलेला दिसत आहे.यापैकी अनेक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी चक्क व्हाट्सअप ग्रुप तयार करून रोज आपण किती किलोमीटर सायकलचा प्रवास केला आणि सायकलला कोणता संदेश पर बोर्ड लावला याचे कृतिशील फोटो ग्रुप वरून शेअर केले जातात. दिवसेंदिवस जगाला पर्यावरण प्रदूषणाचा विळखा जास्तच बसत असताना पलूस मधील अशा जागरूक तरुणांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचे हाती घेतलेले विविध उपक्रम पाहून भविष्यातील सुरक्षित समाजाचे निश्चितपणे आशादायी चित्र निर्माण होत चाललेले पाहून कौतुक वाटते. सायकल प्रेमी तरुणांच्या मध्ये पर्यावरण संवर्धनाच्या प्रबोधनासाठी रोज सायकलवरून प्रवास करणारे आमचे मित्र पलूस मधील बाळासाहेब चोपडे सर,हिम्मतराव मलमे सर व सौ कल्पना मलमे मॅडम हे दामंप्त्य, सचिन निकम,डॉ.चंद्रकांत पवार,डॉ.संतोष देसाई, कृष्णा पवार, दिनेश बडगुजर ,संतोष खेडकर, उदय फडनाईक ,सुजय बर्गे, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे सर तसेच सुनील पुदाले,महेश मदने, डॉ.उमेश पाटील, वरदराज मलमे ,एस. एन. पाटील अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील की ज्यांनी सायकल चालवून पर्यावरणातील प्रदूषण कसे टाळता येईल याचा संदेश दैनंदिन जीवनातून समाजात पेरताना दिसतात.
काल शिवजयंतीचा दिवस. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील ही 392 वी शिवजयंती होती. तेव्हा पलूसच्या पर्यावरणप्रेमी तरुण कार्यकर्त्यानी एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील या शिवजयंतीनिमित्त 75 किलोमीटर सायकल चालवण्याचा संकल्प केला.त्यासाठी ठिकाण निवडले छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गिरीदुर्ग पन्हाळा. पहाटे साडेचार वाजता पलूस येथून सुरू झाली शिववंदन सायकल मोहिम……
हिम्मतराव मलमे, सचिन निकम, पृथ्वीराज पाटील, सतीश पाटील, आदित्य माळी, अथर्व माळी,कृष्णा केसकर, वरदराज मलमे, महेश मदने यांच्या या मोहिमेत उशिरा सहभागी मारुती शिरतोडे व दगडू जाधव. या शिववंदन सायकल मोहिमेचे नेतृत्व 19 वर्षाचा अपंग सायकलपटू कृष्णा केसकर,तेरा वर्षाचा विद्यार्थी वरदराज मलमे, व अठरा वर्षाचा तरुण अथर्व माळी यांनी केले.पलूस मधून मोहिमेस प्रारंभ करताना स्थानिक कार्यकर्ते व शिवप्रेमी तरुण ग्रुप आळते चे कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांनी मोहिमेस शुभेच्छा दिल्या व झाला सुरु सायकल प्रवास…
पलुस,आमणापूर,आष्टा, भादोले वारणानगर,पारगाव बोरपाडळे ते पन्हाळा अशा ७५किलोमीटरच्या सकाळच्या थंड वातावरणातील सायकल सफरीत महामार्गावरील वाठार फाट्यावर कृष्णा पाटील,संदिप पाटील (घुणकी),पुढे सचिन निकम शिवप्रेमी सायकल ग्रुप उंब्रज,ज्येष्ठ साहित्यीक ‘चर्हाट’ आत्मकथनकार दादासाहेब तांदळे,पन्हाळगडाच्या पायथ्याशी पलूसचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आप्पा पाटील,आनंदराव पाटील,युवराज पाटील,ॲड.नितीन पाटील, सईशा फौंडेशन ग्रुप कोल्हापूरचे दिग्वीजय हंबीरराव पाटील,आष्टा येथे सचिन माने सर तर पन्हाळगडावर वीर शिवा काशीद चे वंशज बाळू काशीद व गुरु नायकवडी आदींनी मोहिमेतील सर्वांना भेटून शुभेच्छा दिल्या.काहीनी सायकल पंक्चर काढण्यास मदत केली ,कुणी पाण्याच्या बाटल्या दिल्या तर कुणी चहा आणून दिला.सायकल चालवा प्रदूषण टाळा सायकल चालवा पर्यावरण वाचवा शिववंदन सायकल सफर असे संदेश फलक लावलेल्या सायकली पाहून रस्त्याने ये जा करणारे लोक भारावून जात होते.गिरीदुर्ग पन्हाळगडावर पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशिद ,शूर वीर बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या पवित्र स्मृतीस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.सज्जाकोठी व इतर ठिकाणे पाहून पुन्हा ७५ कि.मी.चा परतीचा प्रवास करुन रात्री उशिरा सर्व सायकलस्वार पलूस मध्ये पोहोचले.यावेळी शिवतिर्थ शिवप्रेमी ग्रुप भारतीनगर चे कार्यकर्ते गिरीष पवार,नितीन जाधव,योगेश माने,आशिष जाधव,अक्षय मदने,किशोर जाधव,अक्षय जाधव,अक्षय होनकळसे व शिवव्याख्याते आकाश गरडे (खोपोली रायगड) आदीनीं मोहिमेतील कार्यकर्त्यांचे स्वागत केले.अशारितीने शिवरायांना वंदन करुन सायकल मोहिमेचा समारोप झाला.