कॉम्रेड मारुती शिरतोडे यांचे प्रतिपादन
लोकदर्शन 👉राहूल खरात सर
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते,श्रमिक,कष्टकरी,कामगारांच्याभल्यासाठी आयुष्यभर रस्त्यावरची लढाई करणारा आणि शिवाजी कोण होता? या पुस्तकाद्वारे खराखुरा लोकराजा जनमाणसात रुजविणारा सर्वोत्तम लेखक,खराखुरा कम्युनिस्ट म्हणून काम केलेल्या गोविंद पानसरे यांच्या कार्यास तोड नाही असे मत पुरोगामी चळवळीतील शिक्षक कार्यकर्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आज पलूस येथे व्यक्त केले. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड तर्फे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ब्रिगेड चे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे होते.प्रारंभी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव यांच्या हस्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कॉ.गोविंद पानसरे अमर रहे या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना कॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले की की भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाने भारावलेल्या पानसरे यांनी समाजात शेवटच्या घटकापर्यंत पक्षाचे विचार रुजविण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले.त्यांनी 1952 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्विकारलेले सभासदत्व आयुष्याच्या अखेरपर्यंत 63वर्षे जपून एक सच्चा क्रियाशील कम्युनिस्ट म्हणून नावलौकिक मिळवला.2013 साली पानसरेना वाझर येथे कॉ.बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्काराने गौरवण्यात आले होते.त्यांच्या विचारांचा,कार्याचा आदर्श घेऊन नव्या पिढीने जीवनात वाटचाल करायला हवी.यावेळी ब्रिगेडचे पदाधिकारी बाळासाहेब खेडकर,पोळ सर,संतोष खेडकर,विनोद आल्हाट,वरदराज मलमे,नैतिक मदने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.