लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी महाराज पुतळ्याच्या मदती करता भव्य पदावली भजन स्पर्धा २०२२ शिवभक्त मित्र मंडळ व समस्त ग्रामवासी निंबाळा यांच्या सौजन्याने मौजा निंबाळा येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की महाराजांच्या विचारांची आज नितांत गरज आहे. त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य व्यवस्थेची, धोरणांची गरज आहे. त्यांच्या लोककल्याणकारी व्यवस्था ग्रामीण भागातील राहणाऱ्या समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. युवकांनी पेटून उठून खरा समाज घडवण्यात दिले पाहिजे. तसेच भव्य पदावली भजन स्पर्धेच्या माध्यमातून समाजामध्ये अंधश्रद्धा जुन्या अनिष्ट चालीरीती यांच्यावर आळा घालण्यासाठी मदत होईल अशी सद्भावना गावकऱ्यांच्या समोर व्यक्त केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विशाल नंदलाल मेश्राम प्रमुख पाहुणे तमुस अध्यक्ष महादेव ताजने, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रा. प सदस्य दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रियंका गेडाम, गोपाल पाल, पोलीस पाटील महादेव पाटील मेश्राम, ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव पाल, भिवसन पाटील मोटघरे, शेख बाबू, सुरेश उरकुडे, प्रभाकर पाल, मधुकर पेंदोर, दिवाकर जी मोटघरे, साईनाथ शेरकी, नीलकंठ जी घाटे, राजेश्वर देवाळकर, रमेश ठोंबरे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल मेश्राम, उपाध्यक्ष आशिष ऐकरे, सचिव सुमित बोरकर, सहसचिव प्रीतम पाल, कोषाध्यक्ष प्रवीण कुरसंगे, पवन मोडवरे, आकाश बोरकर, रोशन देवाळकर, प्रवीण वाघाडे, संतोष मेश्राम, धनराज पिंपळकर, रोशन मेश्राम, सागर मेश्राम, प्रदीप मगरे, शंकर ठोंबरे, मीनाथ शेरकी, मोतीराम जाडे, दिनकर झाडे, नामदेव देवाळकर, गंगाधर मेश्राम, गोविंदा मोटघरे, गणेश सिडाम, धोंडुजी झाडे यांनी सहकार्य केले.